Cotton Soybean Financial Assistance : कापूस सोयाबीन अनुदान उर्वरित निधि वितरित … शासन निर्णय GR | अनुदान लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यावर?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Soybean Financial Assistance : सन २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतक-यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यात यावे. यासाठी कापूस उत्पादक शेतक-यांसाठी रु.१५४८.३४ कोटी व सोयाबीन उत्पादक शेतक-यांसाठी रु.२६४६.३४ कोटी असा एकूण रु.४१९४.६८ कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार संदर्भ क्र. ३ अन्वये दि.२९ जुले, २०२४ रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

 

Cotton Soybean Financial Assistance

 

सन २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य देण्याकरिता जुले, २०२४ च्या पावसाळी अधिवेशञानामध्ये सन २०२४-२५ मध्ये रु.४१९४.६८ कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या ६०% च्या मर्यादेत रु.२५१६.८० कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता दिली होती. त्यास अनुसरुन रु.२५१६.८० कोटी निधी दि.०३ सप्टेंबर, २०२४ च्या शासन निर्णयान्वये वितरीत केला आहे. वित्त विभागाने उर्वरित निधी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे. (Cotton Soybean Financial Assistance)

 

आज झालेला शासन निर्णय पुढीलप्रमाणे :

 

सन २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य देण्याकरिता रु.१५९३.९९ कोटी (रुपये एक हजार पाचशे त्र्याण्णव कोटी नव्याण्णव लाख फक्त) निधी या शासन निर्णयान्वये आयुक्त (कृषि) पुणे, यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. परिच्छेद १ मध्ये नमूद केल्यानुसार, सन २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उपरोक्‍त निधी पुढील लेखाशिर्षांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा. (Cotton Soybean Financial Assistance)

 

तर, वरील शासन निर्णया नुसार आता सर्व म्हणजे 98% निधि मंजूर झाला असून हा वितरित करण्यासाठी उपलब्ध झाला आहे आता लवकरच अनुदान हे शेतकर्‍यांच्या खात्या मध्ये वर्ग करण्यात येणार आहे.

 

Cotton Soybean Financial Assistance

 

हे पण पहा :

* महामेष योजना ऑनलाइन अर्ज सुरू | मेंढी, शेळी, कुक्कुट पालन साठी मिळणार अनुदान

*  सामायिक खातेदारांसाठी महत्वाची सूचना | असे ना हरकत प्रमाणपत्र दिले तरच मिळणार अनुदान

* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?

* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…

* सोयाबीन आणि कापूस अनुदान पोर्टल सुरू | असे पहा आपले अनुदान स्टेटस

* “या” तारखेपासून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान

* माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू .. 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज