NAMO Shetkari Yojana : महाराष्ट्र शासन द्वारे केंद्र सरकारच्या वार्षिक रु. 6000/- मध्ये आणखी रु. 6000/- ची मदत देण्यात येणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील (Namo Yojana) सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकून रु. 12000/- मिळणार आहेत. तसेच, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत चौथा हफ्ता अदा करणे साठी दिनांक 20 ऑगस्ट रोजी निधि देखील मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे आता लवकरच राज्य शासनाचा चौथा हाफता हा शेतकर्यांना पुढील दोन दिवसांत मिळणार आहे.
देशभरात केंद्र सरकार द्वारे पीएम किसान सन्मान निधी ही योजना (NAMO Shetkari Yojana) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. तर, त्याच धरतीवर आता महाराष्ट्र शासन देखील राज्यातील शेतकर्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत वार्षिक 6000/- रुपये हे तीन हाफत्यात देणार आहे.
तर, राज्य शासनाने यासाठी दिनांक 20 ऑगस्ट रोजी निधि देखील मंजूर केला आहे त्यामुळे आता ऑगस्ट महिन्यात राज्यातील शेतकर्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत चौथा हफ्ता मिळणार आहे. (NAMO Shetkari Yojana)
नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत चौथा हप्ता (माहे एप्रिल ते जुले) लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रु.२०४१.२५ कोटी इतका निधी वितरीत करण्यास व योजने अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रु.२०.४१ कोटी, असा एकूण रु.२०६१.६६ कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. (NAMO Shetkari Yojana)
शासन निर्णय : येथे पहा
कोणाला मिळणार राज्य शासनाचा पहिला हफ्ता?
पीएम किसान योजना अंतर्गत ज्या शेतकर्यांना यापूर्वी 17 वा हाफता मिळाला आहे ते सर्व शेतकरी राज्य शासनाच्या या हफ्ता साठी पात्र असतील.
जर आपल्याला पीएम किसान योजनेचे यापूर्वी हफ्ते मिळत नसतील तर आपण खालील माहिती ही अद्ययावत करून घ्यावी जेणेकरून आपल्याला केंद्र शासनाचे पुढील हफ्ते व राज्य शासनाचा पहिला हफ्ता मिळणे सुरू होईल.
- e-KYC करून घ्यावी
- Aadhar Bank Account Seeding/आधार बँक खाते संलग्न करणे
- Land Seeding / भूमी अभिलेख नोंद अद्ययावत करणे
“या” तारखेपासून शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान
बॅटरी संचलित फवारणी पंप साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ