Soyabin Kapus anudan : सोयाबीन व कापूस अनुदानासाठी आता सातबारा वरील नोंद आवश्यक

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Soyabin Kapus anudan : राज्यामध्ये कापूस व सोयाबीन शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना दोन हेक्‍टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती.

 

तर, या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन (Soyabin Kapus anudan) उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मा.मंत्रिमंडळाच्या दि.११ जूलै, २०२४ च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे.

 

त्यानुसार कृषि आयुक्तालया मार्फत ई पीक पाहणी केलेल्या शेतकर्‍यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु, या यादी मध्ये पीक पाहणी केलेल्या काही शेतकर्‍यांची देखील नावे दिसत नव्हती. त्यामुळे आता ई पीक पाहणी एवजी आता सातबारा वरती खरीप हंगाम 2023 मधील सोयाबीन व कापूस पिकाची नोंद असेल तर आता त्या शेतकर्‍यांना अनुदान (Soyabin Kapus anudan) मिळण्यासाठी पात्र करण्यात येणार आहे.

 

तर, बीड जिल्ह्यातील परळी येथील कृषी महोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी ई पीक पाहणीच्या अटीवर वक्तव्य केलं यावेळी त्यांनी सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी ई पीक पाहणीसाठी असणारी अट रद्द करत असल्याची घोषणा केली आणि जर सातबारा वरती पिकाची नोंद असेल तर ते शेतकरी या अनुदानासाठी पात्र असतील असे संगितले.

 

तर, आता पुढे ज्या शेतकर्‍यांच्या सातबारा वरती पिकांची नोंद आहे परंतु यादीत नाव नाही अशा शेतकर्‍यांना कसे पात्र ठरविता येईल या वरती कृषि विभाग कोणती कार्यपद्धती अवलंबणार या कडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष वेधले आहे.

 

हे पण पहा 

 

* सोयाबीन आणि कापूस अनुदान पोर्टल सुरू | असे पहा आपले अनुदान स्टेटस

* “या” तारखेपासून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान

* माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू .. 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज

* महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा संदर्भात अत्यंत महत्वाची सूचना

* सोयाबीन पिवळे पडतेय? मग असे करा एकात्मिक व्यवस्थापन | सोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस)

* शेतकर्‍यांनो सावध रहा | फसव्या पीएम किसान अ‍ॅप्लिकेशन पासून सावध रहा अन्यथा तुमचे पण बँक खाते होणार रिकामे