Kapus Soyabin anudan arj : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अनुदान | असा करा अर्ज pdf डाऊनलोड करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kapus Soyabin anudan arj : मा. उप मुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांनी दि.०५ जुलै,२०२४ रोजी, सन २०२४-२५ च्या अतिरिक्‍त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये, कापूस व सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे, मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किंमतीतील घसरणीमुळे शेतक-यांना नुकसान सोसावे लागले, शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना दोन हेक्‍टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे.

 

या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मा.मंत्रिमंडळाच्या दि.११ जूलै, २०२४ च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे. Kapus Soyabin anudan arj

 

१. राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे. Kapus Soyabin anudan arj

 

२. वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रु.१५४८.३४ कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱयांसाठी रु.२६४६.३४ कोटी अशा एकूण रु.४१९४.६८ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे. Kapus Soyabin anudan arj

 

३. सदरचा खर्च कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मुल्यसाखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्ष २४०१४१९ खाली करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

 

४. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांसाठीचे पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे असतील :

(१) राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्‍टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य अनुज्ञेय राहील.

 

(२) राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी अँप/पोर्टलट्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र राहतील.

 

(३) ई-पीक पाहणी अँप/पोर्टल वर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्याप्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.

 

(४) सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतक-याच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या (081) माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येईल.

 

(५) सदर योजना फक्त सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादीत राहील.

 

राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरीळ नोंदीत कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय नुसार या अर्थसहाय्याचे वित्तरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणांच्या (DBT) माध्यमातून होणार आहे. त्यानुषंगाने अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्याच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमती पत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरीत करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाच्या ना हरकत पत्राचा नमुना सोबत देण्यात आला आहे. 

 

तर, पात्र शेतकरी बांधवांनी खालील अर्ज परिपूर्ण भरून कृषि विभागाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर कृषि कार्यालयात सादर करावेत. अर्ज सोबत आधार कार्ड झेरॉक्स प्रत जोडण्यात यावी. 

 

आधार वापराबाबत संमतीपत्र : डाऊनलोड करा

 

सामायिक खातेदार नाहरकत पत्र : डाऊनलोड करा

 

 

Kapus Soyabin anudan arj
Kapus Soyabin anudan arj